महाराष्ट्र आणि जर्मनीतील बाडेन-वुटेमबर्ग राज्यादरम्यान नर्सिंग क्षेत्रातील सहकार्य ...

This is the header banner section for the current page titled "महाराष्ट्र आणि जर्मनीतील बाडेन-वुटेमबर्ग राज्यादरम्यान नर्सिंग क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी संयुक्त करार करण्यात आला आहे. NEW".

महाराष्ट्र–जर्मनी (बाडेन-वुटेमबर्ग) नर्सिंग सहकार्य करार

महाराष्ट्र आणि जर्मनीतील बाडेन-वुटेमबर्ग राज्यादरम्यान नर्सिंग क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी संयुक्त करार करण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि बाडेन-वुटेमबर्ग राज्याचे मंत्री मॅनफ्रेड लुखा यांनी संयुक्त जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली. या वेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमार, वैद्यकीय शिक्षण आयुक्त डॉ. अनिल भंडारी, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले, सहसचिव डॉ. सुवर्णा खरात तसेच वरिष्ठ अधिकारी अर्चना बढे (नवरे) व धीरेंद्र रामटेके उपस्थित होते.

या करारामुळे महाराष्ट्रातील नर्सिंग विद्यार्थ्यांना जर्मनीत भाषा प्रशिक्षण, कौशल्य विकास, प्रमाणपत्र मान्यता आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून विद्यार्थी–प्राध्यापक आदानप्रदान, संयुक्त प्रशिक्षण व संशोधन उपक्रमांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे नर्सिंग मनुष्यबळ विकसित करण्याचा उद्देश आहे.