डिझाईन पेटंट्स मंजूर
Celebrating Innovation and Excellence in Medical Technology
PSP प्लेट्ससाठी संरक्षक कवच
मुखदंत चिकित्सा व रेडिओलॉजी शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, मुंबई ह्या विभागास भारत सरकारकडून “PSP प्लेट्ससाठी संरक्षक कवच” या अभिनव संकल्पनेबद्दल डिझाईन पेटंट प्राप्त झाले आहे.
ही अभिनव उपकरण रचना रेडिओग्राफिक तपासणी दरम्यान वापरल्या जाणाऱ्या PSP (फोटोस्टिम्युलेबल फॉस्फर) प्लेट्सना होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी तयार करण्यात आली आहे. यामुळे या प्लेट्सचे संरक्षण होऊन त्यांचा टिकाऊपणा व कार्यक्षमतेत वाढ होते.
पेटंट धारक प्राध्यापक:
- डॉ. विजयलक्ष्मी निम्मा
- डॉ. ईश्वरन रामस्वामी
- डॉ. गिरीश पाटील
- डॉ. श्वेता विलवद्रिनाथ
होमिओपॅथी आधारित निदान करणारे एआय उपकरण
शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालय, जळगाव येथील संशोधन पथकास त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेसाठी "होमिओपॅथी आधारित निदान करणारे एआय उपकरण" या डिझाईनसाठी भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून डिझाईन पेटंट प्रदान करण्यात आले आहे.
ही मान्यता होमिओपॅथिक वैद्यकीय तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रातील महाविद्यालयाच्या नवकल्पनांच्या योगदानाचे प्रतीक आहे.
Download Certificate
होमिओपॅथी-इंटिग्रेटेड हेल्थ मॉनिटरिंग डिव्हाइस
होमिओपॅथी-इंटिग्रेटेड हेल्थ मॉनिटरिंग डिव्हाइस हे शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय, जळगाव यांनी विकसित केलेले एक अद्वितीय वैद्यकीय उपकरण आहे. हे उपकरण होमिओपॅथी तत्त्वे आणि आधुनिक आरोग्य तपासणी तंत्रज्ञान यांचा संगम साधून जीवनावश्यक चिन्हांचे निरीक्षण, निदानासाठी सहाय्य आणि उपचार मार्गदर्शन करण्यास मदत करते.
या उपकरणाची रचना डिझाईन्स ॲक्ट, 2000 अंतर्गत अधिकृतरीत्या नोंदणीकृत असून त्याच्या नाविन्यपूर्ण डिझाइनचे संरक्षण केलेले आहे.
Download Certificate